ब्रेकिंगमहाराष्ट्र
अचलेर येथे जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 44 लाख रुपये निधी विकास कामांचा शुभारंभ

अचलेर येथे जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 44 लाख रुपये निधी विकास कामांचा शुभारंभ
अचलेर /प्रतिनिधी
तालुक्यातील अचलेर येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 44लाख रुपये विकास कामांचा शुभारंभ दि.1 एप्रिल 2023 रोजी माजीसरपंच सुभाषराव सोलंकर
व उपसरपंच सौ.प्रणाली राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख म्हणून ग्रामपंचायत सदस्य अनंतसिग बायस, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील , अंबादास कलकुटगे, हरिभाऊ पुजारी, पिंटु खंडाळकर, लक्ष्मीकांत पाटील, आणप्पा कदारे, शशिकांत गोपने, विश्वनाथ खरात, दिनेश वाघमारे, पिंटु पुजारी, अप्पास कांबळे, बब्रुवान कदम, आदि उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाचा शुभारंभ झालयाने नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.