खुदावाडी गावच्या विकासासाठी धडपडणारे युवा नेते – डॉ. शिवशंकर कबाडे

खुदावाडी गावच्या विकासासाठी धडपडणारे युवा नेते – डॉ. शिवशंकर कबाडे
वागदरी/न्यूज सिक्सर
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्ती प्रमाणे गावची आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपल्या उत्पन्नातील काहीअंशी टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात यावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन खुदावाडी गावच्या विकासासाठी धडपडणारे डॉ. शिवशंकर रेवणसिद्ध कबाडे हे विकसात्मक द्रष्टीकोण असलेले गावचे युवा नेते असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता डॉक्टर कबाडे यानी आपली आरोग्य सेवा बजावत मिळेल त्या वेळेत गावांसाठी वेळ काढून सोलापूर सिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आजतागायत खुदावाडी गावातील हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केला आहे.
तसेच जवाहर महाविद्यालय शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर ता.तुळजापूर संचलित संत विनोबा भावे विद्यालय खुदावाडी येथील ८ वी ते १० पर्यंतचे वर्ग गावातील एका सार्वजनिक सभागृहात भरविले जात होते . तीनही वर्ग एकाच सभागृहात भरविल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती . ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ८ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग खोल्याच्या इमारतीचे बांधकाम लोकसभागातून करण्याचे ठरविले आणि शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकामही पूर्ण करण्यात आले.सदर शाळा इमारत बांधकामासाठी डाँ.शिवशंकर कबाडे यांनी स्वखर्चातून शाळेत नवीन फरशी , रंगरंगोटी सह अन्य कामाकरिता जवळपास ५ लाख रुपये दिले असल्याची माहिती डॉक्टर कबाडे यांनी दिली आहे . तसेच गाव, तांडा वाड्या वस्तीवरील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील डॉक्टर कबाडे यांनी शालेय मुलींना शाळेला सायकलने ये – जा करण्याकरिता गरजू मुलींना सोलापूर सिटी हॉस्पिटल च्या वतीने २५ सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले आहे . एकंदरीत गावासाठी केलेल्या योगदानामुळेच आई सरोजिनीताई रेवणसिद्ध कबाडे यांना ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंच पदाची संधी उपलब्ध करून दिली आहे . डॉ. शिवशंकर कबाडे यांनी गावासाठी स्वखर्चातून केलेल्या कार्याबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.
खुदावाडी गावाचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता गावात सोलर प्लांट बसवून गावांना मोफत वीज पुरवठा तसेच संत विनोबा भावे विद्यालय येथे नवीन इमारत बांधकाम करून गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी , यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता मोफत डिजिटल लायब्ररी करण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉक्टर शिवशंकर कबाडे यांनी माहिती दिली.
स्वतः च्या खिशाला एक दमडीचीही झळ न लागता शासकीय योजनेतून केलेल्या विकासकामाचे लोकार्पण किंवा शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी धडपड करून श्रेय लाटण्याचा अनेक पुढारी प्रयत्न करतात पण कसल्याही श्रेयाची अपेक्षा न करता केवळ सामाजिक जानीवेतून निरपेक्ष भावनेने गावविकासाठी धडपडणारा दानत्वाची जाण आसलेला युवा नेता म्हणजे डॉ. कबाडे हे होत.त्यांनी केलेल्या कार्याचे समाजातल्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.