श्री तुळजाभवानी मातेच्या यंदाच्या चैञी पोर्णिमा याञेत येणाऱ्या भाविक भक्त व महिलांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी – पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद

श्री तुळजाभवानी मातेच्या यंदाच्या चैञी पोर्णिमा याञेत येणाऱ्या भाविक भक्त व
महिलांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी – पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मातेच्या यंदाच्या चैञी पोर्णिमा याञेत धार्मिक विधी पुर्वपरंपरे नुसार संपन्न होणार आहे. यंदा निर्बधमुक्त चैञी पोर्णिमा याञा संपन्न होत असल्याने भाविक मोठ्या संखेने येण्याची शक्यता दाट आहे.
राज्य सरकारने महिलांना प्रवासासाठी एसटीत ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवासामध्ये महिलांनी पिशव्या, अंगावरील दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी केले आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा याञेस महिलावर्ग मोठ्या संख्येने येण्याची शक्यता नाकारता यत नाही.सवलत मिळाल्याने एसटीम धून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढणार आहे. गर्दी असताना बसमध्ये चढण्याच्या कारणावरून अथवा आस- नावर बसण्याच्या गडबडीत महिला आपल्या वस्तूंकडे थोडेसे दुर्लक्ष करतात. त्याच काळामध्ये एसटीमध्ये चोऱ्या करण्याच्या बहाण्याने कडेवर लहान मुले व छोटी पिशवी घेतलेल्या महिला मौल्यवान वस्तू, साहित्य, सोने यांची चोरी करतात. तसेच त्या महिला चोरीनंतर एकमेकीला खुणवून थांबा आल्यावर बसमधून उतरतात. पण प्रवासी महिला बसमधून उतरताना अथवा घरी गेल्यानंतर साहित्याची तपासणी करताना चोरी झाल्याचे लक्षात येते. परंतु त्याला खूपच उशीर झाला असतो.
त्यामुळे महिला प्रवाशांनी आपल्याकडील मौल्यवान वस्तू, रोकड यांची काळजी घेणे गरजेचे आहे. बसमध्ये चढताना अथवा उतरताना त्या जाणीवपूर्वक जपायला हव्यात. तर उतरताना आपले साहित्य सोबत असल्याचा खात्री करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी केली आहे.