कृषी उपन्न बाजार समिती निवडणूकीसाठी गणेश रोचकरी यांचा अर्ज दाखल

कृषी उपन्न बाजार समिती निवडणूकीसाठी गणेश रोचकरी यांचा अर्ज दाखल
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बाजार समिती निवडणूकीसाठी गणेश रोचकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूकीत चुरस निर्माण झाली असून देवानंद रोचकरी यांच्यामूळे राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेर च्या दिवशी महाविकास आघाडी च्या नेत्यांची शक्ती प्रदर्शन करत एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप उमेदवारांची नावे निश्चित झाली नसल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली. यावेळी देवानंद रोचकरी गटाच्या वतीने ने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कृषी उपन्न बाजार समिती निवडणूकीसाठी सोमवार (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची झुंबड उडाली होती. सकाळ पासून उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल झाले होते. दुपार नंतर उमेदवारांची गर्दी वाढली. दरम्यान अखेरच्या दिवशी गणेश रोचकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप गोटात खळबळ माजली आहे.महाविकास आघाडीचे अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजपच्या वतीने अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नसल्याने सर्वच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांची अंतिम यादी निश्चित नसल्याने दिवसभरात भाजपच्या वतीने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी गटांच्या वतीने गणेश रोचकरी, अॅड. उदय भोसले यांनी सर्थकासह उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष संभाजी पलंगे यांचा उपस्थिती मुळे उलटसुलट चर्चा सुरू होती.
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी १६१ उमेदवारी आपले अर्ज दाखल झाले आहेत ऐकुण १८ जागेसाठी १६१ – उमेदवार रिंगणात उतरले आहेत