न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिक्षण हे वाघिणीचे दूध असून त्याचा फायदा सर्वसामान्यांनी घेऊन आपल्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवावा – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

शिक्षण हे वाघिणीचे दूध असून त्याचा फायदा सर्वसामान्यांनी घेऊन आपल्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवावा – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शिक्षण हे वाघिणीचे दूध असून त्याचा फायदा सर्वसामान्यांनी घेऊन आपल्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवावा असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.

जवळगा मेसाई येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अजित विद्यासागर लोखंडे यांच्या सत्कार निमित्त बोलताना केले.

यावेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की ग्रामीण भागातून अनेक तरुण स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवीत असून पुढील पिढीने त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून जिद्दीने अजित लोखंडे याने हे यश मिळवले असून ते कौतुकास्पद आहे त्याचबरोबर डॉ. मोनिका लोखंडे MDS, डॉ. मिलिंद लोखंडेMBBS, ऍड शुभम कापसे, सेवानिवृत्त सैनिक दयानंद खबुले आणि भारतीय सैन्यात दाखल झालेले अक्षय वाघ यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची मान ताठ राहील असे काम आपापल्या क्षेत्रामध्ये करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळा मेसाई माध्यमिक विद्यालय जवळगा मे. व उच्चशिक्षित तरुणांच्या पालकांचेही अभिनंदन केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आहे. शिक्षकांनी व पालकांनी त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले. यावेळी पं. स. माजी उपसभापती साधू मुळे, किलजचे सरपंच लक्ष्मण तात्या शिंदे, वडगाव देवचे माजी सरपंच देवकते गुरुजी, माजी जि प सदस्य बालाजी बंडगर, प्रभाकर मुळे, करीम अंसारी, जवळगा मे चे सरपंच नवनाथ जगताप, विद्यासागर लोखंडे, रणवीर चव्हाण, दादासाहेब चौधरी, बाबासाहेब इंगळे, आप्पाराव लोखंडे, नवनाथ नरवडे, वट्टे गुरुजी, श्रीहरी लोखंडे बालाजी जगताप, शाहूराज लोखंडे, लक्ष्मण इंगळे, संभाजी मुळे, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे