७ हजारांची लाच घेताना उमरगा उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर व सेवकाला अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगोहाथ पकडून अटक केली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगोहाथ पकडून अटक केली
७ हजारांची लाच घेताना उमरगा उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर व सेवकाला अटक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
उमरगा उपजिल्हा रूग्णालयात भाडेतत्वावर लावलेल्या दोन गाड्याचे सहा महिन्यांचे बील काढण्यासाठी लॉगबुकवर सही करण्यासाठी ७ हजारांची लाच घेताना उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगोहाथ पकडून अटक केली. ही कारवाई शनिवारी दि. ११ मार्च रोजी करण्यात आली.
एसीबी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दोन गाड्या भाड्याने लावलेल्या होत्या. या गाड्यांचे सहा महिन्याचे बील काढण्यासाठी लॉगबुकवर सही करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी शंकर राठोड यांनी ७ हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयाकडे रितसर तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून एसीबीने सापळा लावला होता. तक्रारदाराकडून ७ हजाराची लाच रूग्णालयातील सेवक राजू राम थोरात याच्या मार्फत स्विकारताना वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी राठोड याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्सनाखाली पोलीस अपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस निरिक्षक विकास राठोड, अमंलदार इफ्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके यांच्या पथकाने केली.