पारधी समजातील सुक्षिशीत बेरोजगार तरुण-तरुणासाठी रोजगार योजनाबाबत उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन.

पारधी समजातील सुक्षिशीत बेरोजगार तरुण-तरुणासाठी रोजगार योजनाबाबत उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
दि.१० मार्च २०२३ रोजी अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक धाराशिव व मा. बी. एम. रमेश, सहाय्यक पोलीस अधिक्षक कळंब यांच्या आध्यक्षतेखाली पोलीस ठाणे कळंब हद्दीतील पारधी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन करुन त्यांना केंद्र व राज्य शासन राबवित असलेल्या दिन दयाल उपाध्याय योजने अंतर्गत सुक्षिशीत बेरोजगार तरुण- तरुणींसाठी रोजगार योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या घरकुल, स्वयंरोजगार, लघुउदयोग संदर्भात वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. व पारधी समाजातील बेरोजगार तरुण- तरुणींची नावे घेवून त्यांना प्रशिक्षण देण्याबाबत अश्वासित करण्यात आले. मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांच्या संकल्पनेमुळे पारधी समाजामधील सुशिक्षीत बेरोजगार यांना नोकरी व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मनिषा वाघमारे यांनी यापुर्वी प्रशिक्षिण घेतलेल्या पारधी समाजातील रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिलेले दोन मुलांनी त्यांचे मनोगत व अनुभव व्यक्त केले. सदर वेळी मनिषा वाघमारे यांनी महिलांना बचत गट स्थापन करुन बचत गटांना मिळणाऱ्या लाभविषयी व लघुउदयोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, धाराशिव व मा. बी. एम. रमेश, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उपविभाग कळंब, कळंब पोलीस ठाणेचे प्रभारी- रविंद्र गायकवाड, जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक- दासुरकर, सपोनि- अतुल पाटील, कल्याण नेहरकर, पोउपनि- रामहारी चाटे, अमोल मालुसरे, मपोउपनि- वर्षा साबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे सचिव वाघ, सामाजिक कार्यकर्ता मनिषा वाघमारे व पारधी समाजातील एकुण 100 ते 125 व्यक्ती हजर होते.