“महिला दिनाच्या पुर्वसंध्येला तिर्थ खुर्द गाव तलावाच्या प्रकल्पाचा उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी साहेबांच्या उपस्थ्तिीत शुभारंभ.”

“महिला दिनाच्या पुर्वसंध्येला तिर्थ खुर्द गाव तलावाच्या प्रकल्पाचा उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी साहेबांच्या उपस्थ्तिीत शुभारंभ.”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महिला दिनाच्या पूर्वसंधेला उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक माननिय अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून आणि कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने तिर्थ खुर्द गावातील तळ्यातील गाळ काढुन संपुर्ण तळ्या भोवती फिरण्यासाठी ट्रॅक बनवण्याऱ्या प्रकल्पाचा शुभारंभ गावातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. तिर्थ खुर्द गावातील ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, महिला व कोव्हिजनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे गावकऱ्यासोबत या कामाचे शुभारंभकरण्यात आले. या प्रकल्पातून अनेक परिवाराचे पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा व्यक्त करण्यात आले. या प्रकल्पा बरोबरच गावातील पौराणिक राम कुंड व इतर परिसराची पाहणी केले असता पुढील काळात तिर्थ खुर्द एक प्रति तिर्थस्थल असेल असा विश्वास कुलकर्णी साहेबांनी व्यक्त केले. या कामात कार्यरत असणाऱ्या कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टच्या एकंदरीत सर्व कामा विषयी स्तुती करण्यात आली. या समारंभ प्रसंगी गावचे सरपंच भैरुदेव सोनटक्के, उपसरपंच संतोषी बालाजी डांगे, ग्राम पंवायत सदस्य विनोद जाधव, रामदास पवार, प्रसाद कानडे, सुधिर पठाडे, राकेश जेटीथोर, नितीन जाधव, सुरेखा कानडे, कोमल पवार, असे उपस्थितीत होते.