ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीदेवीजींस सोन्यासह डायमंडचे ४.६ कॅरेट मणी मंगळसूत्र अर्पण

श्रीदेवीजींस सोन्यासह डायमंडचे ४.६ कॅरेट मणी मंगळसूत्र अर्पण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मध्ये दि. ८ मार्च रोजी सौ. राजलक्ष्मी मालोजीराव भोसले, माजी महापोर रा. पुणे यांनी श्रीदेवीजींस सोन्यासह डायमंडचे ४.६ कॅरेट मणी मंगळसूत्र एक दोरासह वजन २७. ७२० मिली ग्रॅम वजनाची अर्पण केलेली आहे यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबाचा मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे श्री देवीची प्रतिमा व साडी फोटो श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास कदम, विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, रवी गायकवाड, संकेत वाघे, पुजारी दिग्विजय पाटील व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते.