तुळजापूर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा
तुळजापूर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा

तुळजापूर पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पोलिस उपनिरिक्षक पल्लवी पवार व सर्व महिला पोलिस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तुळजापूर पोलीस ठाण्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व महिला पोलिसांचे आदर्श सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तुळजापूर शहरातील शहरवासीय यांच्या वतीने पोलिस ठाण्यात करण्यात आले होते.
त्यावेळी भोलेनाथ लोकरे , अॅड नळेगावकर , पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, माजी मंत्री यांचे स्वीय सहाय्यक दीपक थोरात, शंभू देवकर, राजेश गायकवाड, प्रशांत अपराध आदींची उपस्थिती होती.त्यावेळी पल्लवी पवार यांच्या सत्काराणे कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सर्व महिला पोलिस कर्मचाऱ्यांना फेटा बांधून व गुच्छे व पेढे भरऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक दत्ताभाऊ गवळी
यांनी केले तर भष्ट्राचार निर्मुलन समितीचे आबासाहेब कापसे यांनी आभार मानले