मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने नळदुर्ग येथे शालेय साहित्याचे वाटप

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने नळदुर्ग येथे शालेय साहित्याचे वाटप
नळदुर्ग/न्यूज सिक्सर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अम्रत्य महोत्सवा निमित्ताने नळदुर्ग ता.तुळजापूर येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत मच्छिंद्र मारुती बनसोडे यांच्या सुविद्य पत्नी स्वातंत्र्य सेनानी दिवंगत दुष्यंता मच्छिंद्र बनसोडे यांच्या द्वितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून भिमनगर नळदुर्ग येथील जि.प.प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
येथील स्वातंत्र्य सेनानी दुष्यंता मच्छिंद्र बनसोडे ऊर्फ आऊ च्या द्वितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अम्रत्य महोत्सवा निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते देवानंद मच्छिंद्र बनसोडे व बनसोडे परिवाराच्या वतीने भिमनगर नळदुर्ग येथील जि.प.प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही.सर्जे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून भिमशाहीर नागनाथ दुपारगुडे, सामाजिक कार्यकर्ते हरीष गायकवाड हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले तर सूत्रसंंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यांनी केले.
प्रारंभी स्वातंत्र्य सैनिक मच्छिंद्र बनसोडे व दिवंगत दुष्यंता मच्छिंद्र बनसोडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून मेनबत्ती प्रज्वलित करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले दिगंबर बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण अंगुले सहशिक्षिका आर.एस.पाटील,अंगणवाडीच्या छाया जाधव,सुनिता इंगुले सह
विद्यार्थी उपस्थित होते.