
लोहारा / प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) राज्य रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत दि.७ मार्च रोजी लोहारा येथे विशेष वाहन तपासणी मोहिम राबविली.
या विशेष मोहिमेत खासगी वाहन व वाहनचालक यांची परवान्याची वैधता, हेल्मेट वापर, सीटबेल्ट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही, कर्णकर्कश हॉर्न आदी गोष्टींची तपासणी करण्यात आली.अचानक राबविलेल्या तपासणी मोहिमेमुळे अवैध वाहन धारकाचे धाबे दणाणले आहेत.
या तपासणी पथकात जिल्हा प्रादेशिक परिवहन मोटार वाहन निरीक्षक सौ.प्रियदर्शनी उपासे,मोटार वाहन निरीक्षक प्रसाद पवार,मोटार वाहन निरीक्षक सतीश धुंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजिंक्य दुंबळ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय बदर,वाहनचालक बळीराम शिंदे आदी नी कामगिरी बजावली.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. मात्र,नियमाला डावलून, कागद पत्र ची पुर्तता न करणे आदी ती तपासणी या मोहिमेत केली जात आहे. तसेच अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतुकींच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर व वाहनांवर कारवाई करण्यात सातत्य ठेवले जाणार आहे.
सौ.प्रियदर्शनी उपासे
जिल्हा प्रादेशिक परिवहन मोटार वाहन निरीक्षक