
मुरूम/ प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष पत्रकार डॉ. रामलिंग काशिनाथ पुराणे यांना दि.०२ मार्च वार शनिवार रोजी संगमनेर येथील संजीवनी फौंडेशनच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय “शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दि.०२ रोजी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख मान्यवर शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे सुपुत्र रोहित वाकचौरे,नाशिक पदवीधर मतदार संघ माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, संगमनेर नगर परिषद माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,युवानेते विवेक कोल्हे,कृष्णराज महाडिक, शिक्षणमहर्षी लक्ष्मण पटाडे, संजीवनी फौंडेशन अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.पुराणे यांना सहपरिवार सन्मानित करण्यात आले. डॉ.पुराणे यांचे सतत सामाजिक कार्यात चळवळ चालू असते, जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे अनेक लढा यशस्वी झाले आहेत, त्यांना यापूर्वी सामाजिक कार्यातील डॉक्टरेट,समाजभूषण, कोरोना योद्धा,जननायक, समाजचिंतक, लोकतंत्र के प्रहरी अशा विविध उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.पुराणे यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राजा शिवछत्रपती यांनी सर्व समावेशक जनतेसाठी कार्य केले त्यांची प्रेरणा म्हणजे एक ऊर्जास्रोत आहे, आज मला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खऱ्या अर्थाने आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारा पैकी शिवछत्रपती पुरस्कार माझ्यासाठी अनमोल ठेवा असेल, राजा शिवछत्रपती यांची प्रेरणा घेऊन माझे सामाजिक कार्य चालू ठेवेन व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढत राहीन….
डॉ.रामलिंग पुराणे, सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण