
कोंड/हुकमत मुलाणी
कोंड- उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड येथील पैलवान क्षेत्रात महाराष्ट्रात गावची ओळख पैलवान क्षेत्रात झळकवणारे पैलवान हणुमंत संत्राम लोंढे यांच वयाच्या 91 व्या वर्षी 2/3/2024 रोजी अल्पशा आजाराने लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल आहे.
हणुमंत लोंढे यांना (चिवळाप्पा दादा) आस बोलल जायच ते सतत सर्वसामान्य लोकांच्या सहवासात असायचे .
कोंडसह परिसरातील मल्लांचे ( पैलवान ) वस्ताद म्हणून त्यांची ओळख होती . काळ्या माती , लाल मातीचे कुस्तीचे फड त्यांनी त्यांच्या तरुणपणात चांगलेच गाजवले होते .
दादांना दोन भाऊ नागोराव लोंढे व जग्गनाथ लोंढे या दोन भावांना पण पैलवानकीचा छंद लावून त्यांना पण पैलवान म्हणूनच ओळखल जात आहे.
विशेष म्हणजे हणुमंत लोंढे हे त्या काळात पायाच्या पंजावर म्हणे पायाच्या बोटावर घरातून शेतापर्यंत दोन किलोमिटर अंतर चालत जायचे हा त्यांचा विशेष व्यायाम असायचा
लोंढे हे शेतकरी कुटूंबातील पैलवान त्यांनी त्यांचे मुलही पैलवानच केले .मोठा मुलगा भारत लोंढे हा उस्मानाद धाराशिव येथील पोलीस दलात नौकरीला आहे तर दोन नंबरचा व्यंकट हणुमंत लोंढे हा पुणे येथे सीऐ आहे .तिन नंबर शंकर लोंढे हा उस्मानाबाद धाराशिव येथे पोलीस दलात आहे आणि शिवाजी लोंढे पैलवान आहे .आकरा वर्षापूर्वी अणुमंत लोंढे यांच्या पत्निच निधन झालं .
हणुमंत लोंढे यांना गेल्या पंधरा दिवसापूर्वी कोंड येथील घरात चक्कर येऊन पडल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांच निधन झालं . त्यांच्यावर कोंड येथील त्यांच्या शेतात शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले .त्यांच्या पश्चात चार मुलं, सुना ,नातवंडे आसा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.