
लोहारा-गणेश खबोले
राज्यात ० ते ५ वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि.३ रोजी राबवण्यात येत आहे.भारत पाेलिओमुक्त आहे; परंतु काही देशांमध्ये अजूनही पाेलिओ असल्याने ताे पुन्हा आपल्याकडे येऊ शकताे म्हणून पाेलिओचे डाेस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे.
लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे दि.३ रोजी जिल्हा परिषद शाळेत पोलिओ लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
गावातील नम्रता घंटे या मुलीने आपल्या दोन वर्षांच्या सुनीता घंटे या बहिणीला सकाळी ८ वाजता पाटकुळीवर घेऊन लसीकरण केंद्रात आली.तिच्या या कार्यामुळे कौतुक होत आहे.
सध्या ज्वारी काढणी चे दिवस आहेत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शेतकरी पहाटेच शेताकडे जाऊन जवारीचे धातू मोडण्याचे काम करत आहे त्यामुळे गावातील नम्रता घंटे आई वडील शेताकडे गेल्याने स्वतः दोन वर्षांच्या बहिणीला घेऊन लसीकरण केंद्रात आली.