मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात बेलवाडी जि प शाळा लोहारा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात आले.अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला असता लोहारा तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी शासकीय गट यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक पालक विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंदही असेच प्रेरणादायी वातावरण मिळावी याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान हाती घेण्यात आले. या अभियानाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे त्यानुसार लोहारा तालुक्यातील शासकीय गटामध्ये लोहारा तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे ही शाळा तालुक्यातील इतर शाळा साठी आदर्श ठरले आहे.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी विस्ताराधिकारी सुभाष चव्हाण केंद्रप्रमुख मोहन शेवाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहु जाधव गटशिक्षण कार्यालयातील सर्व अधिकारी व गावातील सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक परमेश्वर सूर्यवंशी,अनंत कानेगावकर,मोरवे खिजर,सुनंदा निर्मले,मल्लिकार्जुन कलशेट्टी सर्वांनी शाळा प्रथम येण्यासाठी मेहनत घेतली.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक आल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे या आनंदासाठी आम्हाला सहकार्य केलेली गावातील सर्व ग्रामस्थ व गटशिक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांची मनःपूर्वक धन्यवाद मानतो.
मल्लिकार्जुन कलशेट्टी