शिवरायांच्या जलदुर्गांची दुरावस्था,लक्ष वेधण्यासाठी किल्ला पोहून पार केला
Post - गणेश खबोले

मुरुड जंजिरा ( अमूलकुमार जैन )
शिवजयंतीनिमित्ये जलदुर्गाकडे लक्ष वेधण्यासाठी कल्याणच्या मुलांनी जंजिरा किल्लते पदामदुर्ग किल्ला पोहून पार केले
शिवरायांचे जलदुर्गांची दुरावस्था झाली आहे पुरातत्व खाते लक्ष देत नाही
मुरुड व कोकणातील जलदुर्गाची दुरावस्था झाल्याने ह्याकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेक्रेड हार्ट स्कूल वर-कल्याणचे १४ विद्यार्थी मुरुड जंजिरा किल्ला ते पदामदुर्ग असे एकूण ८ कि. मि. चे अंतर पोहून पार केले .सर्व मुले १२ ते १८ गटातील असल्याने या मुलांचे सर्वथरावरून कौतुक होत आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्गाकडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती सेक्रेड हार्ट शाळेच क्रीडा शिक्षक श्री. रामचंद्र म्हात्रे यांनी दिली.
या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे, अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे हे पाडसी विद्यार्थी सहभागी झाले व मोहीम यशस्वीपणे पार पडली तसेच सोबत शिक्षक रामचंद्र म्हात्रे , काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेन्द्र साळुंखे, निलेश पाटील हे शिक्षक-पालक कि. मि. चे अंतर पोहून शिवजयंती साजरी करणार आहेत.
उपक्रमाची सुरवात जंजिरा किल्ल्यातून झाल्याने आज रविवार असल्याने हजरो पर्यटकांनी मुलांना टाळ्यावजाऊन ,प्रोत्साहित केले .किल्य्याच्या प्रवेशद्वारावर जयशिवाजी जय जिजाऊ शिवरायांच्या गजरात मुलाची पोहायला सुरवात केल्याने न दमता एकादमात हे अंतर पार केले .मुले पदामदुर्गाला पोहचली तेव्हा तिकडेही पर्यटक असल्याने त्यांनी शिवगर्जनेत मुलांचे स्वागत केले .किल्यात जाऊन भगवा ध्वज फाकवुन सांगता झाली.किल्ल्यात जाण्यासाठी प्रकाश सरपाटील ,गजानन सरपाटील व बंधू सरपाटील यांनी बोट उपलब्ध करून मदत केली
चौकट मुरुड समुद्रकिनारी किल्ल्यात जाण्याची तयारी सुरु असताना मुरूडचे मुख्याधिकारी पंकज भुसे रास्तवरून जात होते त्यांनी विचारले हि मुले कुठे जात आहेत .जंजिरा किल्ल्या पोहून जाणार हे समजताच गाडीतून उतरले व मी देखील यांच्या सोबत पोहून जाणार म्हणून बोटीत बसले कोणतेही पोहण्याचे साधन नसताना गॉगल ,टोपी .स्विमिंग सूट नसताना समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि न थांबता अंतर पार केले .अधीकारी शारीरिक सुदृढ असावेत हे उद्धरण भुसे साहेबाना पाहून सर्वांचं कौतुक वाटले .भुसे साहेब त्यावेळचे अंतर्राष्टीय चॅम्पियन आहे हे नंतर समजे . गडकिल्याबाबत भुसे साहबांचे विचार पाहता जिल्ह्यात त्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे