
मुरूम / प्रतिनिधी
भुसणी येथील दोन वर्षांच्या आतील चिमुकल्या मूकबधिर बाळ कु.सानवि शिवानंद धुतरे (वय- १ वर्ष ११ महिने) हिला कँझायाटल दिफनेस आजार होता तिच्यावर शासकीय योजेतून मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुरूम येथील समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता, दि.०६ फेब्रुवारी रोजी तिच्यावर मुंबई येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडले, त्याबद्दल दि.१७ रोजी भुसणी येथील धुतरे परिवार व भुसणी ग्रामपंचायत वतीने समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे, शरणप्पा वाडे,राहुल चव्हाण आदींचा येतोचित्त सत्कार केला यावेळी भुसणी ग्रामपंचायत सरपंच सौ.पौर्णिमा प्रशांत गायकवाड,ग्रामसेवक बी ए निकम,सदस्य महादेव संगशेट्टे,प्रतिभा सगर,राणी व्हनाजे,धनराज वासुदेव, विमल गाडेकर,भीमाबाई मंडले, ग्रामस्थ प्रशांत गायकवाड,बलभीम व्हनाजे,संजय बिराजदार,सागर मंडले,परमेश्वर माळी, अण्णाराव पाटील,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन बालाजी संगशेट्टे,कांतराव मंडले,तम्मा पाताळे, भीमाशंकर माळी, सरुबाई जामगे,विजयाबाई बिराजदार,श्रीपती मंडले,उमाकांत बिराजदार,बसवराज संगशेट्टे,अनिल बिराजदार आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी डॉ.पुराणे बोलताना म्हणाले नागरिकांनी शासनाचे विविध योजनेचे लाभ घ्यावे, आणि शासकीय रुग्णालयात विविध आजारांवर सुविधा उपलब्ध असून प्रथम प्राधान्य शासकीय रुग्णालयास देण्याचे अवहान केले.