अणदूर येथे शेतकरी मेळावा संपन्न स्व.भगवान भाऊ शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्य शेतकरी मेळाव्याचे करण्यात आले होते आयोजन

अणदूर येथे शेतकरी मेळावा संपन्न
स्व.भगवान भाऊ शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्य शेतकरी मेळाव्याचे करण्यात आले होते आयोजन
अणदूर/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शेतकरी मेळावा संपन्न.
स्व.भगवान भाऊ शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्य हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी शिवप्पा शेटे तर प्रमुख उपस्थिती मध्ये तुळजाभवानी शेतकरी साखर कारखाना चेअरमन सुनिल चव्हाण, गोकुळ कारखाना चेअरमन दत्ता भाऊ शिंदे,सरपंच रामचंद्र आलुरे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी, घुगे,कृषी भूषण पांडुरंग आव्हाड,गुरव सर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते कै.भगवान शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या मेळाव्यात प्रशांत व्हरकट आरळी,अशोक बचाटे मंगरूळ, विकास पात्रे केशेगाव,अजित पवार शहापूर या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सोलापूर येथे झालेल्या सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या ओंकार हागलगुंडे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आला. कृषिभूषण, कृषिरत्न पांडुरंग आव्हाड यांचे एकरी 120 टन ऊस उत्पादन कसे घ्यावे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.उस शेती आधुनिक पध्दतीने कमी पाण्यावरही योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळते या विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब शेटे, सुत्रसंचालन प्रा.एम.बी.बिराजदार व आभार गुरुनाथ कबाडे यांनी मानले. या मेळाव्यास अणदूर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.