पत्रकारावरील खुनी हल्ल्याचा निषेध : गुन्हेगाराला फासीची शिक्षा करण्याची मागणी

पत्रकारावरील खुनी हल्ल्याचा निषेध : गुन्हेगाराला फासीची शिक्षा करण्याची मागणी
वागदरी/न्यूज सिक्सर
राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील दैनिक महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीसे याचा अपघात घडवून जिवंत ठार मारल्या प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने जाहीर निषेध करून गुन्हेगारावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी असी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने नळदुर्ग (ता.तुळजापूर) पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खंदारे याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात पत्रकार शशिकांत वारीसे यांनी दैनिक महानगरी टाईम्स मध्ये बातमी दिल्याच्या कारणा वरुन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थन समितीचे पंढरीनाथ आंबेरकर यांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मोटारसायकलीस जाणीव पुर्वक आपल्या चारचाकी वहानाची जोरात धडक देवून अपघात घडविला.त्या अपघातात पत्रकार शशिकांत वारीसे हा म्रुत्यु पावला.
सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून संविधाने दिलेल्या आभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे.सदर घटनेचा तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. संबंधित गुन्हेगारावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करुन सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून गुन्हेगाराला फासीची शिक्षा करण्यात यावी व म्रुत्यु पावलेल्या पत्रकाराच्या कुटूंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी असी मागणी करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख,तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, उपाध्यक्ष किशोर धुमाळ, सहसचिव शामकांत नागीले, सल्लागार एस.के.गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज देडे,उमेश गायकवाड,आरविंद लोखंडे आदींच्या सह्या आहेत.