
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक स्नेसंमेलनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शपथ फलकाचे अनावरण शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड व मंडळ कृषी अधिकारी डी बी रीतापुरे यांच्या हस्ते करून विद्यार्थ्यांना “मी शपथ घेतो की,आठवड्यातून किमान एकदा तरी पौष्टिक तृणधान्य पदार्थाचे सहकुटुंब सेवन करीन!” ही शपथ देवून करण्यात आली.
तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मंडळ कृषी अधिकारी श्री डी बी रीतापुरे यांनी विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्य ची ओळख व आहारातील महत्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पौष्टीक तृणधान्य च्या बनवून आणलेल्या विविध पदार्थचा स्टॉल ला भेट देवून मान्यवरानी अस्वाद घेतला. या कार्यक्रमा प्रसंगी प्रास्ताविक मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड यांनी केले. यावेळी कृषी सहाय्यक शैलेश जट्टे, दत्ता बोराडे तसेच शाळेतील शिक्षक दयानंद पोतदार, विठ्ठल वचने, गोपाळ सुतार, माधव हन्नमशेट्टी ,विजय नागणे,विद्या मक्तेदार, सारिका पाटील, निर्मला कोळी,स्वाती माशाळकर शिल्पा साबणे व शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एस पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश जट्टे यांनी केले.