
लोहारा / प्रतिनिधी
१ लाख १ हजार रुपये व एक किलो चांदीची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवा नेते तथा माजी जि.प. सदस्य ऍड. दिपक जवळगे यांच्या वाढदिवसानिमित्त देवबेट देवी क्रिडा संकुल व शिवसेना, युवासेना लोहारा उमरगा तालुक्याच्या वतीने शुक्रवारी (दि.१०) लोहारा येथील लोहारा हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य खुल्या जंगी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या कुस्ती स्पर्धेतील शेवटची कुस्ती शुक्रवारी रात्री ९:३० वाजता प्रसिद्ध पैलवान कुमार महाराष्ट्र केसरी विक्रमसिंह भोसले (खवसपूर) विरुद्ध आंतरराष्ट्रीय पैलवान शाहू केसरी संग्राम पाटील कोल्हापूर (इंडियन आर्मी) या दोन दिग्गज पैलवानात जंगी मुकाबला रंगला होता अखेर अटीतटीच्या लढतीत विक्रमसिंह भोसले (खवसपूर) या पैलवानांने प्रतिस्पर्धी पैलवान संग्राम पाटील याचा पराभव करीत विजय मिळवत १ लाख १ हजार रुपये व चांदीच्या गदा चा मानकरी ठरला. यावेळी विजेत्या व उपविजेत्या मल्लाचा आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर व युवा नेते ऍड. दिपक जवळगे यांच्या हस्ते रोख रक्कम, चांदीचा गदा देऊन शॉल, हार, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
श्री. जवळगे यांच्या वाढदिवसानिमित्त देवबेट देवी कुस्ती संकुल धानुरी व शिवसेना, युवासेना, लोहारा तालुक्याच्या वतीने या भव्य खुल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या कुस्ती स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, युवा नेते एड. दिपक जवळगे, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार माधव जाधव, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नरवडे, उपनिरीक्षक श्री. पठाण, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे, अंतरराष्ट्रीय पंच पै. धनराज भुजबळ, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे, पंडित ढोणे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, सतीश एकंबे, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरासह तालुक्यातील व सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील शेकडो मल्लांनी कुस्ती स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेची शोभा वाढवली. रात्री उशिरापर्यंत चाललेली कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेखकांनी गर्दी केली होती.
यावेळी धानुरीचे सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकने, उद्योजक भागवत बनकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राम नाना पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, गणेश जाधव, संभाजी वडजे, यशवंत बुवा, अभिजित साळुंके, विजयकुमार ढगे, प्रशांत काळे, सुभाष राठोड, गोवर्धन आलमले, संदीपान शेळके, बाळासाहेब पाटील, व्यंकट भुजबळ, बबन फुलसुंदर, गुलाब मोरे, ओम बिराजदार, शिवाजी पाटील, मार्तंड शिंदे, सुधाकर सुर्यवंशी, सलीम शेख, शामसुंदर नारायणकर, महेबूब गवंडी, श्रीकांत भरारे, सतीश साळुंके, प्रेम लांडगे, रघुवीर घोडके, नितीन जाधव, यांच्यासह आदी शिवसैनिक, कुस्तीप्रेमी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल बिराजदार यांनी केले तर समालोचन श्री. घाडगे यांनी केले.
२१ हजार व चांदीची गदा कुस्ती स्पर्धेत पै. रामा शेळके विजयी
पै. प्रदीप काळे (गंगावेस कोल्हापूर) विरुद्ध पै. रामा शेळके (सोलापूर) यांच्यात लढत झाली यामध्ये प्रतिस्पर्धी पै. काळे यांचा पै. रामा शेळके यांनी पराभव करीत रक्कम २१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
३१ हजार रुपये च्या कुस्ती स्पर्धेत पै. सचिन घोघरे व पै. हणमंत पुरी विजयी
पैलवान हणमंत पुरी (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध पैलवान सोमविंदर सिंग (हरियाणा) यांच्यात झाली यामध्ये पैलवान हणमंत पुरी यांनी प्रतिस्पर्धी पैलवान सिंग यांचा पराभव करीत विजय मिळवला तर दुसऱ्या कुस्ती स्पर्धेत पै. सचिन घोघरे (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध पै. दिपक मोहिते (मामासाहेब मोहळकर) यांच्यात झाली यावेळी पैलवान सचिन घोघरे यांनी प्रतिस्पर्धी पै. मोहिते यांचा पराभव करीत विजय मिळवला. या दोन्ही कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास प्रत्येकी ३१ हजार रुपये व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.
कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून यांनी भूमिका पार पाडली
या कुस्तीस्पर्धेसाठी पंच म्हणून महेश साळुंके, गणेश जाधव, लक्ष्मण सुर्यवंशी, अब्बास शेख, माधव जाधव, बालाजी सुरवसे, आरुण हावळे, सोमनाथ फुलसुंदर, बरमानंद कार्ले, सुंदर जवळगे, पै. रामेश्वर कार्ले, सतीश चव्हाण, यांच्यासह आदी पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत.