श्रीतुळजाई स्टोन क्रेशरचे मालक लक्ष्मण चौगुले यांनी परिसरातील नूतन सरपंच, उपसरपंच यांचा केला सत्कार

श्रीतुळजाई स्टोन क्रेशरचे मालक लक्ष्मण चौगुले यांनी परिसरातील नूतन सरपंच, उपसरपंच यांचा केला सत्कार
धोत्री /न्यूज सिक्सर
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रे येथील श्री तुळजाई स्टोन क्रेशर चे मालक लक्ष्मण चौगुले यांनी परिसरातील नूतन सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा तसेच राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण चे न्यायिक सदस्य श्री उमाकांत मिटकर व तुळजापूर शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी श्री प्रशांत मिटकर यांची निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रथमता श्री बजरंग बली मारुतीरायाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरांना चौगुले, महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण चे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर, एस पी काळे, शिवाजी चव्हाण, भिमशा पाटील, एडवोकेट जयवंत इंगळे, मधुकर बंदपट्टे, लक्ष्मण चौगुले यांची व्यासपिठावर उपस्थीती होते यावेळी तुळजाई स्टोन क्रेशर च्या वतीने 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर या वेळी वागदरी गावच्या सरपंच सौ तेजाबाई शिवाजीराव मिटकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ, केशेगाव, चिवरी उमरगा, हंगरगा नळ, देवशिंगा, हंगरगा नळ, गुळहळ्ळी, तर सोलापुर जिल्ह्यातील दर्शनाळ, धोत्री,कोंडी येथील गावच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांचा शाल पुष्पुहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उमाकांत मिटकर,प्रशांत मिटकर, एस पी काळेसाहेब यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप शंकरांना चौगुले यांनी केला याप्रसंगी श्रीतुळजाई स्टोन क्रेशर चे मालक लक्ष्मण चौगुले यांचाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात ची प्रास्तावना नवनाथ पवार सर यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले तर आभार लक्ष्मण चौगुले यांनी मानले या वेळी आलेल्या सर्व मान्यवरांना शाकाहारी व मौसाहारी जेवणाची व्यवस्था श्री तुळजाई स्टोन क्रशर चे मालक लक्ष्मण चौगुले व माऊली चौगुले यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली चौगुले, राहुल चौगुले, रखमाजी गायकवाड, भीमसू अलकुंटे, नागेश कुंभार, श्रीनाथ महानुरे, बालाजी पवार, परमेश्वर माने, उमेश चौगुले, अमित चौगुले, नवनाथ पवार तिपान्ना कबाडे, पद्माकर जेवळे, समीर नदाफ आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील अनेक नागरिक महिला यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती