नंदगाव येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार

नंदगाव येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार
लोहगाव/ न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील
नंदगाव येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत
भारतीय जनता पार्टी प्रणित महात्मा बसवेश्वर ग्रामविकास पॅनलने पॅनल प्रमुख सिद्धेश्वर कोरे यांच्या नेतृत्वाखाली चौदा पैकी बारा जागेवर
दणदणीत विजय मिळवला आहे. नवनिर्वाचित सरपंच राधिका घंटे, उपसरपंच वैभव पाटिल, ग्रामपंचायत सदस्य सौ.रेणुका नवनाथ गुड्डे, सौ.कोमल सुधाकर काटे, शशिकांत नागीले,सौ.राधिका श्रध्दानंद कांबळे,सौ.महादेवी भिमराव चिनगुंडे,सौ.प्रज्वला दत्तात्रय शेवाळे, धनराज कलशेट्टी,सौ.नंदाबाई मल्लीनाथ कामशेट्टी,विरसंगप्पा काशिनाथ जमादार, यांचा तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद येथे सत्कार करून नंदगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.असा विश्र्वास दिवून सर्व सदस्यांनीहि तळमळीने पुढिल काळात काम करुन जनतेच्या सेवा करावे असे आवाहन केले.