न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मधुकरराव चव्हाण : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मधुकरराव चव्हाण : राजकीय वादळापूर्वीची शांतता ; वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण जिल्ह्यातील सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सहकारामध्ये तर त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही असे अनेक किस्से यापूर्वी पाहायला मिळाले एकण्यात आले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये त्यांचे कायम वर्चस्व राहिले होते.

सध्या मधुकरराव चव्हाण हे वादळापूर्वीची राजकीय शांतता असं काहीसं चित्र दिसून येते.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस मधून तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यानंतर वाटत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे मानले जातात.राज्यातील समीकरणे बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक झालीच नाही तरीही ते शांत राहिले.मागील चार वर्षांमध्ये राज्यात अनेक वेळा राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे मधुकरराव चव्हाण हे शांत आहेत. आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. चव्हाण हे नक्की कोणत्या पक्षात असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. कारण मुलगा भाजपामध्ये आणि माजी मंत्री चव्हाण हे काँग्रेसमध्ये यामुळे तालुक्यात चर्चाला उदान होते.

तुळजापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात आहे याच मतदारसंघातून मधुकर चव्हाण हे काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली त्यातही त्यांना यश आले होते. असे चव्हाण यांचे ३५ वर्षाचे राजकारण कधी पालकमंत्री कधी आमदार राहिलेत मात्र २०१९ मध्ये बदललेली राजकीय समीकरणे परिस्थिती मुळे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील उमेदवार हे मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात विधानसभा लढवली आणि मधुकरराव चव्हाण त्यांना अपयश आले होते.

आता पुन्हा २०२४ मध्ये मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा दि.४ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीनाथ मंगल कार्यालय तुळजापूर येथे वाढदिवसानिमित्त विधानसभेसाठी पदाधिकारी तसेच तालुक्यातील कार्यकर्ते नळदुर्ग – तुळजापूर नगरसेवक बैठक आयोजित केले आहे. वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. विधानसभा मतदारसंघावर डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे