तुळजापूर शहर विकास आराखडय़ाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी बैठक झाली !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर शहर विकास आराखडय़ाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी बैठक झाली !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहर विकास आराखडय़ाबाबत दि.३ ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱी डॉ सचिन ओमबासे यांच्याशी चर्चा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्य़ाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सकाळी ११ वा. सुमारास जिल्हाधिकारी निवासस्थानी बैठक नियोजित केले होती.
पुजारी मंडळाचे मागणीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर शहराचा विकास हा वरील भागामध्ये व्हावा ह्या मागणीला धरून मंदिर चे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी मान्य केले शहरामध्ये होणे गरजेचे आहे.
आणी तुळजापूर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये समान विकास होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले या बैठकीला ॲड धिरज पाटील, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे, उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, रूशीकेश मगर, अमोल कुतवळ,शाम पवार, सुधीर परमेश्वर, प्रविण कदम, राहुल खपले, भाऊ भांजी, सचिन अमृतराव, लालासाहेब मगर, राजाभाऊ चोपदार, आण्णासाहेब क्षीरसागर, नवनाथ जगताप, बल्लर कदम, अमोल जाधव, मुन्ना धुमाळ, श्रीराम अपसिंगेकर व इतर उपस्थित होते यावेळेस जिलहाधिकारी यांनी तुळजापूर मधील कुठल्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.