
लोहारा-प्रतिनिधी
उमरगा- लोहरा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गुरुवार दि.७ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वा उमरगा येथील कै.शिवाजीदाजी मोरे क्रिडा संकुल छ.शिवाजी महाराज विद्यालय उमरगा येथे जाहीर सभा होणार तरी या सभेसाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.तसेच त्याच दिवशी सायं ६:३० वा लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली काढण्यात येणार आहे.तरी यासाठीही लोहारा शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख लोहारा अमोल दत्तात्रय बिराजदार
आणि शिवसेना शहरप्रमुख लोहारा सलिम जिलानी शेख यांनी केले आहे.