श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदी नागेश शितोळे
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदी नागेश शितोळे

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदी नागेश शितोळे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदी नागेश शितोळे यांची नियुक्ती झाल्याबद्ल दि.१० मार्च रोजी मा. नगरसेवक औंदुंबर कदम, अरविंद कदम, दिपक कदम, अरुण कदम, भगवान टोले, राहुल सोनवणे , पुष्पराज कदम,विशाल कदम यांनी हार श्रीफळ पुष्प गुच्छा देवून सत्कार करण्यात आला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदाचा कार्यकाल केवळ ०४ महिन्याचा करण्यात आला असून मंदिरातील ०३ कर्मचाऱ्यांची ०४ महिन्याचा अंतराने फेरा फेराने धार्मिक व्यवस्थापक पदावर नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओंबासे यांनी काढले आहेत.
विशेष म्हणजे धार्मिक व्यवस्थापकाचे अधिकार कमी करत लेखाधिकारी या कडे सोपवण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक व्यवस्थापक पदाची संगीत खुर्ची केल्याने खळबळ माजली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान चे अध्यक्ष डाॅ. सचिन ओंबासे यांनी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक पदी रोस्टर प्रमाणे मंदिर आस्थापनेवरील ०३ कर्मचाऱ्यांचा नियुक्ती चे आदेश काढण्यात आले असून २०२५ पर्यंत चे रोस्टर जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेशाची अंमलबजावणी दि.०१ मार्च पासून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
०४ महिन्यासाठी नागेश शितोळे स. धार्मिक व्यवस्थापक जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार मावळते धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी पदभार सोडला तर नागेश शितोळे यांनी दि.०१ मार्च रोजी धार्मिक व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला आहे. शितोळे यांचा नंतर सिध्देश्वर इंतुले व त्या नंतर पुन्हा विश्वास कदम – क्रमाणे धार्मिक व्यवस्थापक पदाचा भार फिरणार आहे.