
लोहारा- प्रतिनिधी
मौजे नागूर ता लोहारा जि धाराशिव दि:- 06 एप्रिल 2025 रोजी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोउत्सव हनुमान मंदिरात महिलांनी भजन करून, दुपारी ठीक बारा वाजता पाळण्यात नाव ठेवून फुलांची, गुलालाची उधळण करून, प्रसाद वाटप करून, ” जय श्रीराम ” चा जयघोष करून मोठ्या हर्ष उल्लासात श्रीराम नवमी साजरा करण्यात आली.
श्रीराम जन्मोउत्सव अयोध्या येथे प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान झाले आणि भव्य श्रीराम मंदिर अयोध्या येथे झाल्यापासून हनुमान मंदिरात रोज नित्यनियमाने महिला भजन करीत आहेत. त्यांनीच हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहाने श्रीराम नवमी साजरी केली. यावेळी मृंदाग वादक श्री केशव सोमवंशी, पेटीमास्तर श्री. राजेंद्र जावळे,विणावादक श्री. बब्रुवान जावळे, गायक श्री अक्रुर वरवटे, तुकाराम ओवांडकर, गायीका सौ.इंदू रमेश जावळे, श्रीमती मंदा मोरे, श्रीमती शामल भोसले, सौ.पार्वती महादेव सोमवंशी, श्रीमती मैना मोरे, सौ.अनुसया पंढरी जावळे, श्रीमती छबा सगर, सौ.अनिता शेषेराव जाधव, सौ.केशरबाई अक्रुर वरवटे, सौ.राजश्री बब्रुवान जावळे, सौ.जया जालिंदर जाधव, सौ. केसर धनाजी जाधव, सौ.सुमन प्रताप जावळे, श्रीमती भारत चंदनशिवे, श्रीमती कमल कपाळे, सौ. गजरा मारूती क्षीरसागर, श्रीमती शारद कपाळे, सौ. रुक्मिणी विलास चंदनशिवे आदि महिला भजनी मंडळातील महिला उपस्थित होत्या.
हि रामनवमी उत्साह यशस्वी करण्यासाठी श्री. यशवंत चंदनशिवे, श्री. मारूती क्षीरसागर, रमेश जावळे, आदित्य सिद्राम क्षीरसागर, शुभम मुकूंद क्षीरसागर, शुभम बळी पाटील, करण तानाजी मोरे, शिवम अंकुश क्षीरसागर, सुशांत हरी क्षीरसागर आदीने परिश्रम घेतले.