
लोहारा-प्रतिनिधी
नागूर ता लोहारा येथे गुढीपाडव्यानिमित्त हनुमान मंदिरासमोर पुस्तकांची गुढी उभारून हिंदू नवं वर्ष साजरा करण्यात आले.
अस्मिता बहुउद्देशिय सामाजिक संस्था नागूर यांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम संस्थेचे सचिव श्री यशवंत चंदनशिवे यांच्या सहयोगातून राबविला जात आहे. यावेळी पुस्तकांची गुढी उभारण्यासाठी शंकर जाधव (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती पूर्ण वेळ कार्यकर्ता ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी यशवंत चंदनशिवे म्हणाले,”पुस्तकांची गुढी उभा करण्याचा हा उद्देश आहे की,आजची युवा पिढी हातातले पुस्तक टाकून तो तासोनतास मोबाईल पाहताना दिसतो आहे. मोबाईल गेम तो हाताळताना दिसतो. त्यामुळे संवाद कमी झाला. वाचन संस्कृती नष्ट होते की काय अशी चिंता सतवत आहे. याचा युवापिढीने आपल्या हातातला मोबाईल गरजेपूरता वापरून पुस्तके वाचनाकडे वळवे. कारण पुस्तक हे मस्तक घडविते आणि घडलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. वाचन संस्कृती वाढविणे ती जोपासण्यासाठी आज पुस्तकांच्या गुढी सोबत ग्रामस्थांनाही पुस्तके वाचण्यासाठी भेट देत आहोत.”
यावेळी नागूर गावातील ग्रामस्थाला पुस्तके ही वाटण्यात आली.यावेळी समाजसेवक सतिश कदम,शिवाजी मोरे,शरद पाटील,देवांश जावळे,आप्पासाहेब मसलकर,उध्दव मोरे,शेषेराव जाधव,बब्रुवान सलगरे,मुकुंद क्षीरसागर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.