
लोहारा-प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर लोहारा येथे दि.२२ मार्च २०२५ रोजी दिवाणी न्यायाधीश क स्तर लोहारा एस एस कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर लोहारा पी.एस. बनकर हजर होते.
सदर लोक अदालतमध्ये दिवाणी प्रकरणे – २४ फौजदारी प्रकरणे -३६ निकाली काढण्यात आली.एन आय ऍक्ट १३८ फौजदारी ४ प्रकरणा मध्ये ४,९९,००० रुपये वसूल झाले. वादपूर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कर वसुलीमध्ये एकूण ४३८ प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये ४,६०,११६३ रुपये, रक्कम जमा झाली.भारतीय स्टेट बँक लोहारा -१२ प्रकरणे निकाली निघाली. त्यामध्ये १,८४,४५०० रक्कम वसुल झाली.महाराष्ट्र ग्रामीण बँक यांची एकूण १ प्रकरणे निकाली निघाले त्यामध्ये १,६१,००० रक्कम जमा झाली.युनियन बॅंकचे ४ प्रकरण निकाली निघाली त्यामध्ये २,४७,४५१ रुपये वसूल झाले. नगर पंचायत लोहारा यांची कर वसुलीची ६१ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली त्यामध्ये १,२५,९८०२ रुपये वसुल झाले. महावितरण लोहारा यांची एकूण ३७ प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये ३,०८,२३६ एवढी रक्कम जमा झाली. अशी एकूण १०,४२,३४८० रक्कम वसूल करण्यात आली. फौजदारी प्रकरनामध्ये प्रकरणे निकाली निघाली त्यामध्ये १८,१०० रुपये दंड वसुल झाला.या लोकअदालत मध्ये सर्व बँकाचे शाखाधिकारी,नगरपंचायत अधिकारी,कर्मचारी लोहारा पोलीस ठाणे निरीक्षक डी बी कुकलारे विधीज्ञ मंडळ अध्यक्ष एम एस वचणे-पाटील विधीज्ञ दादासाहेब पाटील,विधीज्ञ पी.एस.मुसांडे,विधीज्ञ बी.के.भुजबळ,विधीज्ञ एम यु जट्टे,विधीज्ञ एस.जी.पनूरे, विधीज्ञ डी.बी.जाधव,आर.बी.जाधव, विधीज्ञ एस व्ही. माशाळकर, विधीज्ञ एस.बी.कदम मार्डीकर,विधीज्ञ एस. एन बादूले,विधीज्ञ टी एस मोरे, विधीज्ञ,विधीज्ञ डी एम जाधव,ए. ए. कुलकर्णी,विधीज्ञ श्रीमती एस आर भुसने मॅडम, विधीज्ञ श्रीमती व्ही व्ही गुंड मॅडम,विधीज्ञ श्री काळे व भोरे सरकारी वकील,विधीज्ञ एस आर.अडसूळे, विधीज्ञ ए.जी शेख, विधीज्ञ एम डी. घवाळे, व इतर विधीज्ञ हजर होते. तसेच सर्व न्यायालय कर्मचारी, पक्षकार मोठया संख्येने हजर होते.