
लोहारा -प्रतिनिधी
रमजान ईद व इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने दि.२२ मार्च रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार व प्रभारी पोलीस निरीक्षक डी बी कुकलारे यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा तालुक्यातील सर्व मस्जिदचे मौलाना तसेच शांतता व मोहल्ला कमिटीतील सदस्य यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये रमजान ईद व इतर सण-उत्सव हे शांततेत व जातीय सलोखा राखून साजरे करावे तसेच नागपूर येथील घडलेल्या घटने बाबत व सोशल मीडियावरील प्रसारीत होणाऱ्या अफावर विश्वास ठेवू नये याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर बैठकीला उपनगराध्यक्ष अमीन सुबेकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी, शिवसेना(ठाकरे) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,आयुब शेख,शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख,नगरसेवक बआरिफ खानापुरे,हरी लोखंडे,पत्रकार मुन्ना फकीर, बालाजी बिराजदार,तानाजी माटे,पोलीस अंमलदार आकाश भोसले,पोलीस अंमलदार माधव कोळी,पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे,पोलीस अंमलदार निरंजन फुलमाळी यांच्यासह नागरीक सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.