ईश्वराची जगातील सर्वात सुंदर निर्मिती आणि सहनशक्तीचा स्त्रोत म्हणजे स्त्री-प्राचार्य शहाजी जाधव
Post -गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजी जाधव, प्रमुख अतिथी म्हणून संचालिका सौ सविता जाधव, प्रा यशवंत चंदनशिवे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेब व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर स्कुलमधील सर्व महिला शिक्षिका, कर्मचारी यांचे मान्यवरांच्या हस्ते लेखणी व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी मीरा माने यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी सविस्तरपणे सांगितली. सविता जाधव यांनी आपल्या भाषणात महिलांची व्यथा व गाथा सांगून महिलांचे प्रश्न, जीवन, आरोग्य, कार्यक्षमता, सामजिक योगदान याविषयी ” कधीही न सुटणारे कोडे म्हणजे स्त्री” या कवितेतून महिलांना विविध भूमिकांमधून नातेसंबंध, कुटुंब,समाज यात समतोल राखण्यासाठी कशी तारेवरची कसरत करावी लागते ते स्पष्ट केले. प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी आपल्या भाषणात “चूल व मूल” ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आजची नारी जगात भारी कशी आहे याची अनेक उदाहरणे सांगितली.