
धाराशिव -प्रतिनिधी
रेड क्रॉस सोसायटी धाराशिव द्वारा संचलित रेड क्रॉस ब्लड स्टोरेज सेंटरचा भव्य शुभारंभ दि.१४ रोजी देशमुख हॉस्पिटल तांबरी विभाग येथे उत्साहात पार पडला.या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लाकाळ आयएमएचे अध्यक्ष डॉ.कानडे,वुमन्स हॉस्पिटलच्या सुप्रीडेंट गवळी मॅडम तसेच डॉ.सचिन देशमुख यांच्या हस्ते या ब्लड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी प्रास्ताविकात डॉ.मोरे यांनी रेड क्रॉस संस्थेची पूर्ण माहिती दिली तसेच ब्लड स्टोरेज सेंटर सुरू करण्या मागचा उद्देश स्पष्ट केला व या सेंटरमध्ये जिल्ह्यात प्रथमच NAT टेस्टेड बॅग उपलब्ध आहेत याबद्दलची पूर्ण कल्पना सर्व उपस्थित डॉक्टरांना दिली गेली.या कार्यक्रमास धाराशिव व जिल्ह्यातील प्रतिष्ठित सर्वच डॉक्टर मंडळी उपस्थित होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रेड क्रॉस सारखी संस्था धाराशिव येथे स्थापन झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक करून या संस्थेस शुभेच्छा दिल्या.