
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भातांगळी या शाळेमध्ये एसपीसी योजना अंतर्गत पोलिस अधिक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शना खाली शालेय विद्यार्थ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले .
महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर पोलिस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पो.नाईक आतीश सारफळे यांनी दिले शाळेचे एसपीसी नोडल मुख्याध्यापक श्री गायकवाड व शिक्षक वृंद तसेच सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक रवि जगताप सह आदी उपस्थित होते