
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल च्या मैदानावर नेहरू युवा केंद्र धाराशिव यांच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये १५ ते १९ वयोगटाच्या मुले व मुलींच्या कबड्डी खो-खो धावणे गोळा फेक आदीच्या स्पर्धा घेण्यात आल्या
या स्पर्धेचे उद्घाटन न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहारा प्राचार्य शहाजी जाधव,यानी केले प्रमुख पाहुणे छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा तालुका व्यवस्थापक किशोर औरादे,जनकल्याण समिती प्रमुख लोहारा शकर जाधव,पंच म्हणून हायस्कूल लोहारा चे शिक्षक वैजीनाथ पाटील,यशवंत चंदनशिवे {नेहरू युवा पुरस्कार प्राप्त समाजसेवक अस्मिता बहुउद्देशिय सा संस्था सचिव) व्यंकटेश पोतदार,सौ.सोनाली काटे,अनिता साखरे,ईश्वरी जमादार,मिरा माने, वैशाली गोरे आदींनी पंच म्हणून जबाबदारी पार केली
या स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धा मुले…प्रथम हायस्कूल लोहारा,द्वितीय न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहारा,तृतीय अस्मिता कबड्डी संघ नागूर,खो-खो स्पर्धेमध्ये मुली..प्रथम न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहारा,द्वितीय हायस्कूल लोहारा, तृतीय कन्या शाळा लोहारा,वैयक्तिक धावणे स्पर्धेमध्ये मुले प्रथम मोहित पाटील,द्वितीय सतीश सूर्यवंशी,तृतीय यशराज खळे,धावणे स्पर्धा मुली प्रथम समृद्धी लोखंडे,द्वितीय मोमीन महनूर,तृतीय मनस्वी देवकर,वैयक्तिक गोळा फेक स्पर्धेमध्ये मुले प्रथम मेघराज आनंदगावकर,द्वितीय प्रदयु जगताप,तृतीय पृथ्वीराज मूर्टे,मुलींच्या गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम धनश्री चौरे, द्वितीय संध्या जाधव,तृतीय माही गुन्हेवार विजयी झाले.
या स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना नेहरू युवा केंद्र धाराशिव यांच्या वतीने ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला