ब्रेकिंग
दिवंगत भाजपा मा पंचायत समिती सदस्य वामनराव डावरे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..
Post-गणेश खबोले

लोहारा(प्रतिनिधी)
दस्तापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तापूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक वर्गातील आदर्श विद्यार्थी यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी वामनराव काका डावरे सोशल फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार आणि शैक्षणिक सप्ताह राबणार असल्याचे सुरज डावरे यांनी सांगितले यावेळी ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ पाटील, सरपंच मनीषा काळाप्पा, शालेय समितीचे अध्यक्ष सिध्दप्पा स्वामी, दस्तापूर ग्रामपंचायतची सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक गणेश राठोड, सहशिक्षक
अमिलपुरे सुभाष,कुलकर्णी नरसिंह
हुंजे दीपक ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते