
लोहारा (प्रतिनिधी)
शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोहारा येथे २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या यु.व्ही. पाटील या होत्या. हा कार्यक्रम तहसील कार्यालय लोहारा, गटशिक्षणाधिकारी कार्यालय लोहारा व नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. रणजीतसिंह कोळेकर (तहसीलदार,लोहारा) यांनी नवमतदारांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव आपले नाव नोंदविणे गरजेचे आहे असे मत मांडले.मतदार नोंदणी संदर्भात काही अडचणी असतील तर त्या त्वरित सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या यू. व्ही. पाटील यांनी मतदार जनजागृती होणे काळाची गरज आहे, त्याशिवाय लोकशाही ही मजबूत होणार नाही असे मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे व मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले.तसेच नवमतदाराचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व माहितीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार नाना मोरे,गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण,मंडळ अधिकारी बी.एस.बरनाळे,निवडणूक विभाग प्रमुख वजीर आत्तार तसेच व्यंकट पोतदार, आशपाक शेख, समाधान शिरसागर, यांच्यासह नोडल आधिकारी डॉ. विनोद आचार्य,डॉ. छाया कडेकर,डॉ.पार्वती माने,डॉ.प्रभाकर गायकवाड व प्रकाश राठोड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ.मनोज सोमवंशी यांनी मानले.