
लोहारा (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा,’ ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा ‘, या मागणीसाठी आज लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ईव्हीएम बंद करून यापुढे देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर शिक्का मारून घेण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. धिरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष केशव सरवदे,जेष्ठ नेते चंद्रकांत दादा साखरे, कॉंग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, मुकेश सोनकांबळे, सोशल मिडिया युवक काँग्रेस जिल्हा समन्वयक संग्राम जगताप, बसवराज काका पाटील, रौफ बागवान, इस्माईल मुल्ला, प्रकाश होंडराव, शिवानंद तोरकडे, माणिक कुसळकर साहेबलाल शेख अॅड. संगमेश्वर माशाळकर, मल्लिकार्जुन बनशेट्टी, कमलाकर बिराजदार, प्रविण बोंदाडे, बाबुराव डोंबे, लायक पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.