पोलीस कस्टडीत मृत्यू पावलेल्या न्याय द्या,आरोपीला शिक्षा करा… लोहारा बंद

लोहारा (प्रतिनिधी)
परभणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर असलेल्या संविधान प्रतिमेची तडफोडीमुळे वादंग झाला होता. दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या परभणी बंद दरम्यान हिंसाचार झाला होता, त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. त्यामधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्य झाला.मृत्यू प्रकरणाची एस आय टी / सी आय डी चौकशी करावी व या प्रकरणात मारहाण करणाऱ्या पो. नि यांच्यासह सह दोषी पोलिसांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासना कडून ५० लाख आर्थिक मदत करावी कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नौकरी देऊन पुनर्वसन करण्यात यावे ही मागणी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत करीत महाराष्ट्र बंदची दि.१६ रोजी हाक देत लोहारा शहरात व्यापारी वर्गाने दुकाने बंद करून बंद ला पाठींबा दिला.
निवेदनावर रिपाई तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, स्वप्नील माटे, तात्याराव कांबळे,एम आय एम तालुकाध्यक्ष अमिरहमजा खुटेपड,अमित सुरवसे,बालाजी माटे, किशोर भालेराव,सुमित कांबळे,प्रतिम शिंदे,संभाजी सुरवसे, अल्ताफ सुबेकर,निवृत्ती थोरात,सुरज माटे,अरबाज फकीर,लक्ष्मण रोडगे यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.