लोहगावच्या सरपंच, सदस्यांसह तंटामुक्त पदाधिकार्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

लोहगावच्या सरपंच, सदस्यांसह तंटामुक्त पदाधिकार्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपात प्रवेश
तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून असलेले काँग्रेस नेतृत्व त्यांनी आता अमान्य केले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नेतृत्व मान्य करीत लोहगावचे सरपंच प्रवीण बसवराज पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विनायक काटकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत माने, मारुती बनसोडे, सचिन काटकर, माळाप्पा बनसोडे, अविनाश मेंडके, वीरभद्र मेंडके, सोपान मारेकर, लक्ष्मण शेंडगे, पोपट शेंडगे, नवनाथ मेंडके, शिवानंद कलशेट्टी, संतोष जगताप, अतुल पाटील, अशोक बिराजदार, अक्षय पाटील, तात्या काटकर, संजय स्वामी, नागनाथ कोकरे, शंकर बनसोडे, नितीन स्वामी, अभिषेक बनसोडे, सूर्यकांत फडताळे, सातलिंग पाटील, अर्जून माशाळकर यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्वांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी निर्धार केला आहे.