तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे ॲड धिरज पाटील यांच्या प्रचाराला ७२ गावातूनगती, महिलावर्गांचा चांगला प्रतिसाद -डॉ.शुभांगी धीरज पाटील
प्रचाराला ७२ गावातूनगती, महिलावर्गांचा चांगला प्रतिसाद -डॉ.शुभांगी धीरज पाटील

तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे ॲड धिरज पाटील यांच्या प्रचाराला ७२ गावातूनगती, महिलावर्गांचा चांगला प्रतिसाद -डॉ.शुभांगी धीरज पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारातील चुरस शिगेला पोहोचली आहे. यादरम्यान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फे धिरज आप्पासाहेब पाटील यांच्या पत्नी डॉ.शुभांगी धीरज पाटील व विद्यमान खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या पत्नी सौ संयोजनी ओमप्रकाशराजे निंबाळकर गाव गावी जाऊन महिलांना व जेष्ठ नागरिकांना संवाद साधून प्रत्येक गावातून आपली विचार मांडत भव्य पदयात्रा काढून प्रत्येकाच्या अडचणी जाणून प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊन प्रचार करीत आहे. त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून त्यांच्यासोबत जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे पवार, कटके ताई सर्व महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित आहे.
आपला प्रचार अधिक गतिमान करून बेंबळी, ताकवीकी, केशेगाव ग्रामीण भागामध्ये आपली लोकप्रियता वाढवली आहे.
नोकरी शिल्लक नाहीत किंवा नोकऱ्या शिल्लक असल्या तरी त्या भरल्या जात नाहीत आणि या नोकऱ्या न भरल्यामुळे शिकलेले तरुण देखील बेरोजगार म्हणून फिरत आहेत त्यामुळे त्यांचे कौटुंबिक स्वास्थ बिघडले जाते आहे .या सामाजिक समस्येकडे सरकार पाहत नाही म्हणून आपण महाविकास आघाडीच्या वतीने युवकांची भूमिका समजून घेऊन पुढील काळामध्ये युवकांच्या भवितव्यासाठी काहीतरी भरीव काम करण्याचा निश्चय या निवडणुकीच्या दरम्यान केला आहे. असे देखील यावेळी उमेदवार ॲड कुलदीप उर्फे ॲड धिरज आप्पासाहेब पाटील यांच्या पत्नी यांनी बोलताना सांगितले.