ब्रेकिंगमहाराष्ट्र
योगेश रामदास कदम यांची मंत्रीमंडळात समावेश होण्याकरीता श्री तुळजा भवानी मातेस घातले शिवसेनेच्यावतीने जागरण गोंधळ.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

योगेश रामदास कदम यांची मंत्रीमंडळात समावेश होण्याकरीता श्री तुळजा भवानी मातेस घातले शिवसेनेच्यावतीने जागरण गोंधळ.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
कोकणातील शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास भाई कदम यांचे चिरंजीव खेड,दापोली,मंडणगडचे आमदार योगेश दादा कदम यांची महाराष्ट्राच्या होवू घातलेल्या मंत्रीमंडळात समावेश होण्याकरीता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेस क्षत्रिय मराठा कदम परिवार व शिवसेनेच्यावतीने धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,नासिक जिल्हा सहसंपर्कप्रमुख गणेश कदम यांनी सहपत्नी देविस अभिषेकपुजा व जागरण गोंधळाचा विधी करून साकडे घातले. यावेळी बीडचे भाऊसाहेब कदम,पुण्याचे डाॅ.प्रवीण कदम,नांदेडचे मुरलीधर कदम,भोपे पुजारी नानासाहेब कदम,स्वराज कदम,रोहित कदम,हजर होते.