भूम येथे 78 वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा.
पत्रकार भूम औदुंबर जाधव

भूम येथे 78 वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा.
भुम : औदुंबर जाधव
भूम येथे 78 वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा. धाराशिव होमगार्ड जिल्हा समादेशक गौवर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र नायक कोकरे, कॉटन मास्टर सुभेदार गोचडे तसेच प्रशासकिय अधिकारी सुरुसे यांच्या मार्गदर्शनाखाली भुम तालुका होमगार्ड समादेशक प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत 7 डीसेंबर रोजी भुम येथील ग्रामदैवत आलंमप्रभू देवस्थान येथे 78 वा होमगार्ड वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन भुम तालुका होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन सोहळा सप्ताह 7 डिसेंबर ते 13 डीसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो.7 डीसेंबर रोजी भुम येथे उत्साहात साजरा करण्यात आला़.होमगार्ड संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाची प्रभात फेरी काढून सुरुवात करण्यात आली या नंतर ग्राम दैवत आलंमप्रभू देवस्थान येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच अन्नछत्र या ठिकाणी होमगार्ड यांनी परीश्रम घेऊन सहकार्य केले होमगार्ड चिरायू होवो, वंदे मातरम,भारत माता की जय, हम सब एक है, अशा जल्लोषात तालुक्याच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.होमगार्ड सैनिकांनी कोरोना काळात कर्तव्य करून शासनाला मोलाचे सहकार्य केले.कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक उत्सव बंदोबस्त होमगार्ड फार चांगल्या जबाबदारीने कर्तव्य बजावतात. होमगार्डच्या कार्याची प्रशंशा करत सर्व मान्यवरांनी होमगार्ड सेवा ही पोलिसांचे सच्चे साथीदार असल्याचे सार्जंट औदुंबर जाधव यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच तालुका समादेशक पाटील यांनी आपल्या भाषणातून होमगार्ड सैनिकांच्या कर्तव्याचे कौतुकास्पद अभिनंदन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक फलटण नायक गाढवे यांनी केले वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सार्जंट औदुंबर जाधव व फलटण नायक अंकुश थोरात तसेच पथकातील महिला पुरुष होमगार्ड यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.