विधानसभा मतदारसंघातील काही तक्रार असतील तर – मतमोजणी निरीक्षक रामप्रसाद चौहान यांचेसमक्ष माडता येतील
ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

विधानसभा मतदारसंघातील काही तक्रार असतील तर – मतमोजणी निरीक्षक रामप्रसाद चौहान यांचेसमक्ष माडता येतील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
२४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक २०/११/२०२४ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार दिनांक २३/११/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. २४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी स्पोर्टस हॉल श्री तुळजाभवानी अभियांत्रकी महाविद्यालय तुळजापूर येथे मतमोजणी होणार असून सदर मतमोजणी सकाळी ०८.०० वाजता सुरु करण्यात येणार आहे.
२४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री. रामप्रसाद चौहान यांची मा.भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून निवडणूक प्रक्रिया अथवा मतमोजणीच्या अनुषंगाने कोणास काहीही तक्रार असल्यास त्यांना भेटण्यासाठी मा. मतमोजणी निरीक्षक हे, शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे दि.२२/११/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ व दुपारी ०२ ते ०५ या कालावधीत उपस्थित आहेत. तरी २४१-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार/प्रतिनीधी/मतदार यांना निवडणूक/मतमोजणी संदर्भाने त्यांच्या तक्रारी मा. मतमोजणी निरीक्षक यांचेसमक्ष मांडता येतील असे आवाहन मतमोजणी निरीक्षक श्री. रामप्रसाद चौहान यांनी केलेले आहे.