धाराशिवचे पाटील ॲन्ड तुळजापूरचे पाटील यांच्यात दुरंगी सामना
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

धाराशिवचे पाटील ॲन्ड तुळजापूरचे पाटील यांच्यात दुरंगी सामना
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
बहुचर्चित तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अखेरीस काँग्रेसचे माजी मंत्री मधुराचव्हाण यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे धीरज पाटील आणि महायुतीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामध्ये दुरंगी लढत होण्याची चित्र आहे. दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे तुळजापूर विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 51 अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी 28 उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे धीरज आप्पासाहेब पाटील व भाजप महायुतीचे राणाजगजीतसिंह पाटील, याशिवाय इतर उमेदवार असे प्रहार जनशक्ती पक्षाकडून अण्णासाहेब दराडे, ऑल इंडिया इन्कलाब तांबोळी शब्बीर, राष्ट्रीय समाज पक्षाचे धनंजय पाटील, आदर्श संग्राम पार्टीचे धीरज पाटील, आझाद समाज पार्टीचे भैय्यासाहेब नागटिळे, समाजवादी पार्टी देवानंद रोचकरी, जनहित लोकशाही पक्ष सचिन शेंडगे, वंचित बहुजन आघाडी कडून डॉ स्नेहा सोनकाटे, याशिवाय अपक्ष असणारे उमेदवार आमीर इब्राहिमशेख, आमीर सरदार शेख , उज्वला गाटे, काकासाहेब राठोड, योगेश केदार तात्या रोडे दत्तात्रय कदम, धनाजी हुबे पूजा देडे, मन्सूर शेख, गणेश रोचकरी, सत्यवान सुरवसे असे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमधून ज्या उमेदवारांनी उमेदवार अर्ज मागे घेतले आहेत त्यामध्ये मलंग शेख, सौ अनिता साळुंखे, सौ अर्चनाताई पाटील, ऋषिकेश मगर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, दत्तू पिंपळे, नवनाथ उपळेकर, निलेश साळुंखे, प्रल्हाद सगर, मनोज जाधव, मुकुंद डोंगरे, रोहित पडवळ, शुभांगी पवार, सचिन साळुंखे, संजय निंबाळकर, सिद्धेश्वर जाधव, जीवन गोरे, व्यंकट गुंड, अशोक जगदाळे, अश्रुबा कोळेकर, कालिदास गायकवाड, प्रकाश चव्हाण, तनवीरअली खतीब, महंत तुकोजी बुवा , प्रतिक रोचकरी, प्रल्हाद सगर, शरीफ शेख सुनील नागणे या 28 उमेदवारांचा सहभाग आहे. काँग्रेस पक्षाकडून पाच वेळा निवडणूक जिंकणारे आणि नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवणारे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपला अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लागले आहे. मागील एक वर्षापासून महाविकास आघाडी कडून निवडणूक उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य अशोक जगदाळे यांच्यावर देखील अर्ज माघारी घेण्याची नामुष्की आलेली आहे. तिसरा गाडीचा पाठिंबा घेऊन या तालुक्यांमध्ये अण्णासाहेब दराडे या युवकांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. मराठा आरक्षणाच्य अनुषंगाने काम करणारे योगेश केदार यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला आहे. मनोज जळके पाटील यांच्या भूमिकेला स्वीकारून उमेदवारी अर्ज दाखल केलेले महंत तुकोजी बुवा महाराज आणि माजी नगराध्यक्ष सौ. अनिता साळुंखे व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जन साळुंके यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
ॲड योगेश केदार
योगेश केदार यांनी निवडणुकीत भरली रंगत. मराठा चळवळीतून महाराष्ट्रात नावारूपाला आलेले तसेच शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहिलेले, योगेश केदार यांनी आपला अपक्ष फॉर्म कायम ठेवला. तिसरी आघाडीचे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना पुरस्कृत केले आहे. व्यंकट गुंड यांना स्वराज्य पक्षाचा ए बी फॉर्म मागे घ्यायला लावून योगेश केदार यांना पाठिंबा दिला. असे कळत आहे.