
लोहारा-प्रतिनिधी
मातीच्या पणत्या विक्रीला… दिवाळी काहीच दिवसांवर आली आहे. या सणात मागणी असते ती पणत्यांची.पण आता या काळात मातीच्या पणत्या ची मागणी जरी कमी झाली असली तरी त्या पणत्या मुळे दिवाळीत लागणाऱ्या प्रकाशाचे महत्त्व वेगळे आहे.तेलातील वातीची जागा मेणबत्ती च्या पणत्या घेऊ शकत नाहीत.ग्रामीण भागातील कामगार लोहारा शहरातील आठवडी बाजारात पणत्या विक्रीकरिता आलेले दिसुन आले.बाजारात ठिक ठिकाणी मातीच्या पणत्या विक्रीसाठी आलेले दिसुन आले.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील पणत्या विक्रेते गणेश कुंभार आणि मनोज कुंभार हे परंपरागत व्यवसाय जोपासत पणत्या कमी भावात विक्रीसाठी आले होते.