
लोहारा प्रतिनिधी
” स्वीप “अंतर्गत लोहारा हायस्कूल लोहारा या प्रशालेमध्ये “Promissory vote ” by HSL हा नावीन्यपूर्ण आणि सर्व पालकांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी एक भावनिक आवाहन त्यांच्या मुलांकडून करण्यासाठीचा वचननामा मुलांनी पालकाकडून लिहून घेतला .
फक्त मुलांनी लिहिलेल्या पत्रांना आजचे पालक जुमानतील असे वाटले नाही ; म्हणून मुलांना वचननामा काय असतो “प्रॉमिसरी नोट “याची माहिती होईल आणि मुलांनी केलेल्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांचे पालक निश्चितच मतदान करतील ही संकल्पना या कार्यक्रमातून हायस्कूल प्रशालेने राबवली .मुलांना यासाठी एक वचननाम्याची प्रत प्रशाले कडून दिली गेली ज्यामध्ये हे पत्र पालकांना दाखवून त्याचे वाचन करून त्यावर त्यांची स्वाक्षरी घेऊन ते पत्र प्रशालेच्या ग्रुप वर मुलांनी अपलोड करावे आणि २० नोव्हेंबर तारखेपर्यंत म्हणजे मतदानापर्यंत ते जपून ठेवावे या पद्धतीने या “प्रॉमिसरी व्होट “वर काम प्रशालेने केले .
प्रशालेच्या ६९० विद्यार्थ्यांपैकी ६५० विद्यार्थ्यांनी एका पानावर सुंदर हस्ताक्षरामध्ये रंगीबेरंगी पेन चा वापर करून एक “प्रॉमिसरी व्होट “नावाचे पत्र पालकांच्या स्वाक्षरीने प्रशालेत सादर केले या उपक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद निश्चितच येणाऱ्या मतदानात पालकांची टक्केवारी वाढणारे असेल असा अंदाज बांधता येतो .
प्रशालेने मुलांना केंद्रस्थानी ठेऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले त्याची माहीती पालकांना व्हावी व सत्राच्या शेवटी होणारा ” दिपोत्सव ” व पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे मुख्याध्यापकांचे व शालेय व्यवस्थापन विकास समितीच्या अध्यक्षांचे संयुक्त पत्र सर्व 690 विद्यार्थ्यांना देण्यात आले.