न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

काँग्रेसचे सहप्रभारी कुणाल चौधरी यांनी महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळणार हे निश्चित केले.

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

काँग्रेसचे सहप्रभारी कुणाल चौधरी यांनी महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षालाच उमेदवारी मिळणार हे निश्चित केले.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

मनीषा मंगल कार्यालय कावलदरा येथे कार्यमक्रमात दि 6 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाचा BLA बूथप्रमुख यांचा मेळावा पार पडला.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी मध्यप्रदेशचे माजी आमदार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहसचिव कुणाल जी चौधरी, माजी आमदार , अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष एम एम शेख व जिल्हाध्यक्ष ॲड .धीरज पाटील यांच्या  प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमासाठी बी.एल.ए व बूथप्रमुख व कार्यकर्ते  हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. माननीय कुणाल जी चौधरी यांनी बुधप्रमुखांना संबोधित करताना म्हणाले की  संविधान रक्षणासाठी, दीन दलित कष्टकरी शेतकरी मजूर युवक अल्पसंख्यांक यांच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या सामान्य माणसाचा आवाज बनलेल्या राहुलजी गांधी यांची  जीभ कापून आणा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड  यांचा  तीव्र शब्दात निषेध केला  . जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांच्या विषयी अवमान कारक वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राणा पाटील यांचे  डिपॉझिट जप्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी प्रत्येक कार्यकर्त्याने खंबीरपणे उभं राहावं असे आव्हान केले. व आजच्या या बूथप्रमुखाच्या मेळाव्या मधून तुळजापूर विधानसभेचा उमेदवार घोषित करीत आहोत. हाताचा पंजा हा तुळजापूर विधानसभेचा उमेदवार असून  महायुतीच्या  आमदारांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी तुळजापूर विधानसभेमध्ये हाताचा पंजा या उमेदवाराला असंख्य मताने विजयी करा असे आव्हान केले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांनी सर्व प्रथम धाराशिव मधील सर्व चार विधानसभा BLA व बूथ कमिटी यांच्या अहवालाचे वाचन केले. व आपले विचार व्यक्त करताना  काल भाजपा आमदार यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता अतिशय अवमानकर भाषा वापरत जो  अपमान केला त्याचा निषेध  केला व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेदाचा ठराव संमत करण्यात आला. तुळजापूर विधानसभेत महाविकास आघाडीचा पक्ष देईल तो उमेदवार  निवडून द्यावे असे आव्हान केले. महायुती सरकारने ज्या घोषणाचा सपाटा लावला यावर सडकून टीका केली. या तालुक्यात कोण हुकूमशाही करणार असेल तर त्यास जनता कधीच माफ करणार नाही. त्यामुळे मी तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचून त्यांची सेवा करेन एवढाच विश्वास त्यांनी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी ॲड धीरज पाटील, सयाजीराव देशमुख, सय्यद खलील सर, सौ ज्योतीताई सपाटे,डॉक्टर स्मिताताई शहापूरकर, सौ ढवळे ताई,श्री अनिल लबडे,जनसेवक अमोल भैय्या कुतवळ, तालुकाध्यक्ष रामदादा आलूरे,धाराशिव तालुका अध्यक्ष विनोद वीर,राजाभाऊ शेरखाने, प्रशांतजी पाटील, आयुब पठाण, पांडुरंग कुंभार, सत्तार भाई  शेख, महेश देशमुख,माझी नगरसेवक नागनाथ भाऊ भांजी,श्रीकांत बापू धुमाळ, अग्निवेश शिंदे, रामराव पाटील,बालाजी भाऊ बंडगर, हरीश राठोड, सुधीर गव्हाणे भारत चव्हाण बापू हरकर काका सोनटक्के बापू खटके सलमान चौरे राजाभाऊ मोरे अतुल वानेवाडी प्रदेश सरचिटणीस महेश देशमुख व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे आधी काँग्रेसचे पदाधिकारी व तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे