सततच्या पावसामुळे शेत पिकाचे नुकसान,पंचनामे करून भरपाई देण्याची शिवसेना(उबाठा) ची मागणी
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे व ढगफुटीचा सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात १) लोहारा तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करण्यात यावी व मदत देण्यात यावी .२)लोहारा तालुक्यामध्ये सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे बाबत३) सर्व बाजारसमितीमध्ये हमीभावाप्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात यावी ४) कोणत्याही जाचक अटी न टाकता शासनाने एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी. ५)दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे. ६) शेतकऱ्यांना शेतासाठी दिवसा वेळेवर व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात यावी ७) अनेक शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान जाहीर झाले असून ते अजूनही मिळाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना ते अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे.८)काल लोहारा मागणी धानोरी या मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्याचे पदराने तात्काळ करण्यात यावेत व सरसकट अनुदान व पिक विमा तात्काळ देण्यात यावा आदी मागणी करण्यात आली आहे.
सर्व मागण्या शासनाने तात्काळ पाठपुरावा करून सोडवाव्यात अन्यथा या मागण्या मान्य नाही झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असे निवेदनात देण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक धाराशिव दीपक जवळगे,शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख,प्रा.पांडुरंग पोळे,मेहबूब गवंडी,श्रीकांत वडजे,कुलदीप बडोरे,केशव सर्वदे,बळीराम गोरे,बलभीम रसाळ,विलास साळुंखे,राम मिटकरी,सचिन रसाळ,दत्तू रसाळ,सोमनाथ पाटील,प्रभाकर रसाळ,विश्वनाथ सुतार,बंसी जाधव,पंडित रसाळ,किसन रसाळ,सविता मडोळे,शालिनी चव्हाण यासह शिवसेना पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.